Monday, February 4, 2013

कुठे तरी हरवलीये मी ..
कुठे तरी हरवलीये मी..

या धावत्या जगात ,या अनोळखी जगात,
ओळखूनही अनोळखी वाटणाऱ्या या आपल्याच माणसांच्या पसाऱ्यात !

कुणी सांगेल का कुठे आहे मी?
कुठे हरवलीये मी?
कुणाला ऐकू येतोय का माझा आवाज ?
कुठेतरी हरवलीये मी.. या दूष्ट जगात.

आपलीच माणसे नकोशी वाटतात,नाही नाही ते बोलतात!
" त्याची " वाट  पाहणारे डोळे चटकन पाणावतात.
" तो " परत  आला नाही म्हणून मन चिडते..
पण शेवटी स्वतःचीच समजूत काढते...
कुठेतरी हरवलीये मी सारखे वाटते...

डोळ्यांपुढे मिट्ट काळोख आहे,त्यामुळे काहीच दिसत नाहीये.
या आयुष्याच्या अंधारातल्या विचारांनी " हरवलय " मला.
जिंकण्याची कुठेच आशा दिसत नाहीये.
कुठेतरी हरवलीये मी...

कुठेराई हरवलीये मी या स्पर्धेत..
आयुष्यातल्या  स्पर्धेत,
सगळे  जग आपल्याला पाठी सोडून पुढे धावतंय..
आपणच या शर्यतीत मागे राहतोय..
कारण कुठेतरी हरवलीये मी...


कुठेतरी हरवलीये मी..
कुठेतरी हरवलीये मी...

- बरखा चव्हाण