Sunday, February 19, 2012

तु ....


मैत्री केव्हा झाली आपल्यात  
कळलेच नाही मला... 
मित्र म्हणता म्हणता 
तु कधी प्रियकर झालास 
कळलेच नाही मला...
सुर्य उगवुन मावळतीला आला 
कळलेच नाही मला...
आपल्यात दुरावा कधी निर्माण झाला 
कळलेच नाही मला,
मनात विचार येतो 
तु  फसवलेस नाही ना मला ..??
पण इथेही नशिबालाच मी दोष देते,
आज इतकी वर्ष उलटून गेली 
आठवण तुझी प्रत्येक क्षणी येते !
सिनेमातल्या नायक नायिकेला पाहताच 
तिथे तु आणि मी दिसते...
प्रेम गीत ऐकताना विचार तुझाच  येतो
वृद्ध जोडपं पाहिल्यावर 
आपलं म्हातारपण असंच असतं 
अस चित्रं डोळ्या समोर येतं...
का कोण जाणे 
तु मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात 
अजुन तसाच आहेस 
जसा पहिल्या भेटीत होतास
किती नाही म्हटलं 
तरी माझ्या मनाशी 
तुझा लपंडाव सुरूच आहे...
विचार खुप येतात तुझे
पण ते मी जगाला दाखवुन देत नाही
तुलाही वाटत असेल 
विसरले असेन मी तुला..
तर नाही...!!!
तुझ्यासोबत लग्न तर झाले नाही
आता तुझ्यासोबत लग्न होणे कठीण आहे
कारण परिस्तिथीच तशी आहे...
कितीही मनात असलास 
तरी आता काहीच शक्य नाही
इथे मी चकोर आणि तु चंद्र आहेस 
असं वाटायला लागलंय.
फक्त तुला पाहु शकते लांबुन...!
तुझ्याशी लग्न तर झालेच नाही
तुझी होऊ शकले नाही मी....
पण मनात तुझ्याशी लग्न 
मी केव्हाच केलंय...

-बरखा चव्हाण 

No comments:

Post a Comment